महाराष्ट्र

आता शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा अनुकंपाचा नियम लागू!

 

 

सेवेत कार्यरत असतांना मृत्यू आल्यास,कुटुंबातील व्यक्तीला नोकरी मिळणार!राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय!

मुंबई२६ऑगस्ट:-या अगोदर शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना, त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत अनुकंप तत्वावर सामावून घेण्यात येते.परंतु यापूर्वी वर्ग१ आणि वर्ग २या मध्ये येणाऱ्या शासकीय अधिकारी यांना, अनुकंप तत्वाचा नियम लागू नव्हता.परंतु आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत, अधिकारी अ आणि ब अधिकारी यांचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सेवेत सामावून घेण्यात येणार, असल्याने, अधिकारी वर्गात येत असलेल्या, नोकरवर्गाला शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या महामारीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाच्या अनेक संघटनांंनी अधिकारी वर्गातील नोकरदारांना अनुकंप तत्वाचा नियम लागू करण्याची मागणी करण्यात आली होती.राज्य मंत्रिमंडळाच्या या प्रस्तावामुळे कोरोनाच्या काळात ज्या अधिकाऱ्यांनी आपला जीव गमवाला आहे,त्यांच्या कुटुंबाला या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहेगट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021 तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील