क्रीडा

आगर येथे कब्बडी खेळांमध्ये तोंडगाव संघ विजेता तर अकोला संघ उपविजेता

अकोला : आगर येथिल विश्व शांती क्रिडा मंडळ व अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत अंतिम फेरित तोंडगाव संघ व शिव प्रतिष्ठान संघ अकोला यांच्या मध्ये चुरशीच्या लढतीत तोंडगाव संघ विजेता ठरला या संघाला ३१ हजार एक रुपये बक्षीस देण्यात आले. तर उपविजेत्या संघाला २१ हजार एक रुपये देण्यात आले तसेच तिसरे व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस अनुक्रमे बेलखेड व शहापुर संघाला देण्यात आले.

तिन दिवस चाललेल्या खेळा मधे अकोला.वाशिम.बुलढाणा. अमरावती येथिल ३२ सघांनी भाग घेतला होता, खेळांचा आनंद घेण्यासाठी कबड्डी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. संचालन प्रविण शेषराव शिरसाट यांनी केले, खेळ यशस्वी करण्यासाठी विश्व शांती क्रिडा मंडळ. हनुमान क्रिडा मंडळ प्रज्ञावंत क्रिडा मंडळ यांचे सह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

यादरम्यान जिल्हा कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष संग्राम गावंडे, सचिव वासुदेवराव नेरकर. अकोट फैल पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रसार व त्यांचे सहकारी. तसेच राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या अनेक खेळाडूंनी व त्यांचेसहकाऱ्यांनी भेट देवुन आगर वाशियांचे कौतुक केले.