पश्चिम महाराष्ट्र

 अहमदनगर शासकीय जिल्हा रुग्णालयात आग लागून १०रुग्णांचा मृत्यू!

अहमदनगर, ६नोव्हेंबर: अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या वॉर्डात आग लागल्याने १०रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून, सहा रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी पैकी एका रुग्णाची स्थिती चिंताजनक असल्याने, त्याला अहमदनगर येथील एका खाजगी इस्पितळात भरती करण्यात आले असून, अग्नीशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.अशी माहिती अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रसार माध्यमांना दिली.

ही आग कशामुळे लागली त्याची अद्यापपर्यंत माहिती मिळाली नाही. ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.नगर येथील हॉस्पिटलमध्ये लागलेली  आगीची घटना पाहिली नसून, यापूर्वी सुद्धा अशा अनेक आगीच्या घटना घडल्या असून, शेकडो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अहमदनगर नगर येथील शासकीय रुग्णालयात६नोव्हेंबरच्या दुपारी लागलेल्या या आगीत कोरोनाने पीडित असलेल्या१०रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची प्राथमिक माहिती नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

यापूर्वी२३एप्रिल२०२१रोजी विरार मधील विजय वल्लभ रुग्णालयाला आग लागून१३रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे.

या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता. त्यामुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.9 एप्रिल – नागपुरात कोविड सेंटरला लागलेल्या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू होरपळून मृत्यू झाला होता.26 मार्च – मुंबईतील भांडूपमधील कोविड रुग्णालयात आग, लागूूून आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

९जानेवारी रोजी  जिल्हा रुग्णालयात आग लागून 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा येथे घडली आहे. नवजात शिशूंसाठीच्या विशेष अतिदक्षता विभागात, म्हणजेच  मध्ये आग लागल्यानं ही घटना घडल्याचं समजतं.

एकूण १७ बालकांना या अतिदक्षता विभागातठेवलं होतं, पैकी ७ बालकांना अग्निशामक दलाकडून वाचवण्यात आलं आहे. यात अगदी एक दिवसाच्या जन्मलेल्या बाळापासून ते तीन महिन्याच्या बालकांचा समावेश आहे.

मृतकाच्या नातेवाईकांना ५लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली असून,ही आग कशामुळे लागली याचा तपास १०दिवसाच्या आत लावल्या जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.