अहमदनगर : विवाहित महिलेची बदनामी केल्याचा जाब विचारल्याचा राग धरुन कुटुंबातील महिलांना शिवीगाळ व जबर मारहाण करुन विनयभंग केल्याप्रकरणी डॅनियल शालमंन देठे, सुनील शालमंन देठे यांच्यासह कमलबाई शालमंन देठे, मानियल शालमंन देठे व शामवेल शालमंन देठे यांच्यावर नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
यामधील काही आरोपींना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी पिडीत कुटुंबीयांनी केली आहे.
पाचेगाव (ता. नगर) येथे 07 फेब्रुवारी रोजी पिडीत महिला आजारी असल्याने त्याची तब्येत पहाण्यासाठी अहमदनगर मधून त्याचे कुटुंबीय गावात आले होते. सदर सर्व कुटुंबीयांनी घरा शेजारी असलेल्या डॅनियल शाल मंन देठे याला महिलेची बदनामी का करत असल्याचा? जाब विचारला. त्याने सदरील कुटुंबीयांना शिवीगाळ करुन फिर्यादी महिलेच्या बहिणीचा विनयभंग केला.
त्यानंतर तेथे इतर आरोपी गज, लाकडी दांडके व विटकर घेऊन आले व फिर्यादी महिलेच्या सर्व कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडल्यानंतर सुनिल देठे याने गजाने डोके फोडले. तर कमलाबाई व शालमनं देठे हिने देखील जबर मारहाण केली. तर सदर आरोपींनी सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.