महाराष्ट्र

अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, 19 फेब्रुवारी : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

यावेळी केंद्रीय गृह मंत्री शाह यांनी पत्नी सोनल अमित शाह यांच्यासह कुंकूमार्चन पूजा केली. तसेच ‘आई अंबाबाई, सर्वांना सुख, समृध्दी दे !’ अशी प्रार्थना केली. यावेळी मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, समरजितसिंह घाटगे, महेश जाधव, राहुल चिकोडे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.

दरम्यान गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री अंबाबाईची प्रतिमा देवून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.