अकोला क्राईम

अकोला : एटीएम फोडणारे चोरटे दहा तासात गजाआड

अकोला : मुर्तिजापुर शहर येथे कारंजा बायपास येथे असलेले हिताची कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडुन त्यामधील रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु एटीएम अज्ञात चोरट्यांना फोडुन रक्कम चोरण्याचा त्यांचा प्रयत्न फसल्याने ते पळुन गेले. सदर प्रकरणी मोहन खवले (५२) यांनी पो स्टे मुर्तिजापुर शहर येथे दिलेल्या तक्रारीवरून पो स्टे मुर्तिजापुर शहर येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ४६१, ३८०, ५११, ४२७ भादंवि अन्वये नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हा घडल्याची माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी त्यांचे पथकासह घटनास्थळी जावुन घटनास्थळाची पाहणी केली. तपास अधीकारी पोउपनि गोपाल जाधव व त्यांचे पथकातील अमलदार यांना सदर गुन्हयांतील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्या बाबत सुचना दिल्या. त्यावरून तपास पथकाने १० तासाचे आत सदर गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील आरोपी रूपेश काळे (२८) यांचे नाव निष्पन्न करून त्यास ताब्यात घेवुन गुन्हया बाबत विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक केली.