anjangaon-road
अकोला

अंजनगाव रोडची दयनीय अवस्था; अपघाताला निमंत्रण

अकोटः शहरातील अंजनगाव रोड ची दयनीय अवस्था झाली असून शिवाजी विद्यालयासमोर कित्येक दिवसापासून अपुर्ण रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आला आहे.

येणार्‍या काळात जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर हा रोड मोठ्या भीषण अपघाताला आमंत्रण देऊ शकतो.याबाबत शिवसेना उद्धव ( बाळासाहेब ठाकरे गटाचे ) मनिष रामाभाऊ कराळे यांनी गुरुवारी २३ फेब्रु.२०२३ रोजी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधीकार्‍याला निवेदन देत जाब विचारला. जनतेच्या होणारे या गैरसोयीची तात्काळ दखल घेत आठ दिवसाच्या आत या कामास पूर्णपणे सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी यावेळी मनीष कराळे यांना दिले.

आकोट शहरातील अनेक वर्षापासुन रखडलेली कामे सार्वजनीक बांधकाम विभागाने हाती घेतली आहेत त्यात रस्त्याची सुद्धा कामे आहेत परंतु ही रस्ताची कामे अतिशय धीम्या गतीने सुरु असल्यामुळे ती अद्यापही पूर्णत्वास आलेली नाहीत.त्यातीलच एक रोड म्हणजे शहरातील अंजनगाव रोड सदर रोड वरून अनेक अधिकारी लोकप्रतीनीधी जाणे येणे करतात पण त्यांना मात्र रस्त्याची दुरवस्था तसेच संबधित परिस्थिती ही दिसत नाही.

या अतिशय रहदारीच्या रोडवर अकोला,तेल्हारा मार्गावरून येणारी सर्वच प्रकारची लहान,मोठी वाहने वाहतूक करतात तसेच शिवाजी शाळा व ज्युनिअर कॉलेज मध्ये शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातुन शालेय विद्यार्थी दररोज जाणे येणे करतात.

आज जर सद्यस्थितीत आपण रोडची परीस्थीती पाहली तर स्वतः आपणच दुर्लक्ष करून मोठ्या भीषण अपघाताला निमंत्रण दिल्यासारखी गत आहे.याबाबत सार्वजनीक बांधकाम विभाग व संबधीत रोडचे ठेकेदारांवर एवढि मेहेरबानी का ? असा सवाल आज सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे आज रोजी काळजीपोटी अनेक पालकवर्ग मुलामुलींना स्वता शाळेत सोडतात कारण रस्त्याची दयनीय परिस्थिती त्यांना ठाऊक आहे.

शालेय विद्यार्थ्यांना आज शिक्षणासाठी आपला जीव मुठीत घेवुन प्रवास व ये जा करावी लागत आहे.तरी सदर काम हे येणार्‍या आठ दिवसात पुर्ण करा अन्यथा सार्वजनीक बांधकाम विभागाला अनोख्या तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल तद्नंतर होणार्‍या परीणामास सर्वस्व जबाबदार संबधीत विभाग व अधिकारी असतील तसेच जर कोणता मोठा अपघात झाला तर त्यासाठी जबाबदार संबधीत अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल याची नोंद घ्यावी.

मनीष रामाभाऊ कराळे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विजु नामदेव ढेपे मा उप शहर प्रमुख अंकुश कुलट गजू सोळंके विशाल कोडापे सागर जावरे अंकुश पाचपोहे गणेश कुलट संदीप गौर नितीन काकड धनराज गावंडे बबलू नांदूरकर राजू ये?ोकार अंकुश बोचे गोलू वालशीगे गौरव वालशिगे संजय पालखळे संतोश मोहोकार पिंटू वडत्कार प्रफुल आवट.