अकोला

हिवाळी अधिवेशनात महादेव कोळी समाजाला दिलेल्या शब्दाची आठवण

महादेव कोळी समाजाचा पालकमंत्री, महसुलमंत्री यांना स्मरण पत्र
अकोला : हिवाळी अधिवेशनामध्ये दिलेल्या शब्दाची महादेव कोळी समाजाकडून अकोला जिल्हयाचे पालकमंत्री तथा महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अकोला दौऱ्यावर असतांना महादेव कोळी समाज बांधवांनी सर्कीट हाऊस अकोला येथे भेट घेऊन स्मरण पत्र देण्यात आले.
नागपूर हिवाळी अधिवेशन काळात महादेव कोळी समाजाचा जात प्रमाणपत्र तसेच वैद्यात मिळण्यासाठी शासन कटिबद्ध असून सदर प्रकरणे निकाली काढण्यासाठी शासनाच्या आदेशाने लकरच पत्र जारी करण्यात येणार असल्याचे त्यावेळी अकोला जिल्हयाचे पालकमंत्री आश्वासन दिले होते. यासंबंधी कोणतेही आदेश न निघाल्याने पुन्हा अकोला येथे पालकमंत्री विखे पाटलांची भेट घेऊन अकोला जिल्हयातील महादेव कोळी समाजाच्या वतीने स्मरण पत्र निवेदन देण्यात आले.