देश

जेएनयूमध्ये दोन गटांत हाणामारी!

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमधील साबरमती ढाब्यावर शुक्रवारी विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विचारसरणीच्या डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशनचे विद्यार्थी उपस्थित होते. बैठक सुरु झाल्यानंतर काही वेळातच दोन्ही गटांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी देखील झाली.
हाणामारीत अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमींवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २०२४ च्या जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी कॅम्पसमधील बैठकीत अभाविप आणि डाव्या गट या दोन गटांत वाद झाला. यावेळी डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली असे अभविपच्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अभविच्या विद्यर्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. या घटनेचे काही व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले.