पश्चिम महाराष्ट्र

सरकारला भूल देऊन बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम यशस्वी!

 

बैलगाडा शर्यती सुरू करण्यांची जनतेची मागणी,शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांचे प्रतिपादन!

सांगली२०ऑगस्ट:-शासनाचा विरोध आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त असूनही,सरकारला भूल देऊन, सांगली जिल्ह्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना यश आले आहे.बैलगाडा शर्यती सुरू करण्याची मागणी ही शेतकरी आणि जनतेची मागणी असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी या बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांं समोर केले आहे. बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी आणली असून,जनतेच्या वतीने शासनाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करून, बैलगाडा शर्यती सुरू व्हावी,अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची आहे.सरकारने बैलगाडा शर्यत प्रेमीं साठी न्यायालयात पाठपुरावा करावा, हा आजच्या बैलगाडा शर्यतीच्या आयोजन मागील उद्देश असल्याचे पडळकर यांचे मत आहे.झरे गावातील पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत ७बैलगाड्यांनी भाग घेतला होता.बैलगाडा शर्यतीबाबत सरकारनं तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा बैलगाडीसह मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “राज्य सरकारनं बैलगाडा शर्यत सुरु करण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात बाजू ठामपणे मांडावी, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता. तो या बैलगाडा शर्यतींचं आयोजन करुन शेतकऱ्यांनी सरकारपर्यंत पोहोचवला आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “बैलगाडा शर्यतींचं करण्यात आलेलं आयोजन हे शेतकऱ्यांनी यशस्वी केलेलं आहे. मी फक्त निमित्त आहे. हे सर्व शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. हा १० ते २०किलोमीटर पायी प्रवास चालून केला आहे. पोलिसांचा आणि आमचा संघर्ष नाही. ते त्यांचं काम करत आहेत. सरकारनं त्यांना पुढं केलं आहे. आमचा हेतू हाच की, राज्य सरकारनं यामध्ये लक्ष घालावं आणि बैलगाडा शर्यत सुरु व्हावी. यामध्ये दुसरा कोणताच हेतू नाही.” पुढे बोलताना दे म्हणाले की, “राज्य सरकार यासाठी सुप्रीम कोर्टात पाठपुरावा करत नाही. या विषयात लक्षच देत नाही. राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे की, बैलगाडा शर्यत हा विषय शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे, त्यामुळे हा विषय शासनाने त्वरीत सोडवला पाहिजे. ही आज पार पडलेली बैलगाडा शर्यत, शासनाला जाग करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे,असे गोपीचंद पडळकर यांनी प्रसार माध्यमांंना सांगितले