अकोला

पोही गावात उसळला बौद्ध अनुयायांचा जनसागर ; कार्यक्रमातून दिला एकतेचा संदेश शिवजयंतीनिमित्त बौध्द विहारात केली तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना


बौद्ध धर्मातील दानशुर राजकीय नेते सम्राट डोंगरदिवे यांनी भेट दिल्या हजारो उपासिकानां पांढऱ्या शुभ्र साड्या

मूर्तिजापूर20फेब्रुवारी:-मूर्तिजापूर तालुक्यातील पोही गावच्या बौद्ध विहारात शिवजयंतीनिमित्य थायलंडहून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पुज्य भदन्त धम्मसेवकजी महाथेरो यांच्या हस्ते विधीवत करण्यात आली.
सदर कार्यक्रम हा तिन सत्रामध्ये संपन्न झाला प्रथम सत्रात भिक्खुंची धम्मदेशना या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुज्य भदन्त धम्मसेवकजी महाथेरो(अध्यक्ष भिक्खु संघ महाराष्ट्र राज्य )उद्‌घाटक म्हणून पुज्य भदन्त एस.नागसेनजी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पुज्य भदन्त अश्वघोष थेरो वटफळी,पुज्य भदन्त चंद्रमणी वाळेगाव, पुज्य भदन्त आनंद अनभोरा, पुज्य भदन्त राहुल बोधी मंगरूळ कांबे, पुज्य भदन्त बोधीपाल मूर्तिजापूर इत्यादी पूजनीय भदन्त गणांची उपस्थिती लाभली धम्मदेशने पूजनीय भदन्त महासेवकजी महाथेरो यांनी बौद्ध विहार, बुद्ध ,बोधिसत्व व बुद्ध आणि त्यांचा धम्म यांचे आपल्या मधुर वाणीतून उपस्थित उपासक-उपासिकांना अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत महत्त्व पटवून दिले आणि शेवटी बौद्ध विहार हे सुसंस्कृत मानव घडवण्याचे केंद्र असल्याचे प्रतिपादन केले तर द्वितीय सत्रामध्ये मान्यवरांचे स्वागत आणि पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये बौद्ध धर्माच्या नियमानुसार जी व्यक्ती आपल्या कमाईतील विसावा हिस्सा हा समाज कार्यात दान करतो अशा दानशुर सम्राट डोंगरदिवे यांना जिल्ह्यातून एक समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले तर समाजभूषण पुरस्कार धम्मबोधी डोंगरे अकोला व गौतम इंगळे अनभोरा धम्मभूषण पुरस्कार मनोहर वानखडे पोलीस उपनिरीक्षक शहर पोलीस स्टेशन मुर्तीजापुर , बाळासाहेब ढोके माना उत्कृष्ट सामाजिक पत्रकारिता पुरस्कार मिलिंद जामनिक ब्रम्ही व अजय प्रभे मुर्तीजापुर, ग्रंथवाचक पुरस्कार, शौर्य पुरस्कार व बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलींद प्रश्न, भारतीय संविधान हे ग्रंथ सामाजिक कार्यकर्ते भवनसुंदर वानखडे यांच्या कडून दान पुरस्कारासोबत वितरण पूजनीय भदन्त महासेवकजी महाथेरो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये अकोल्याची अविका जामनिक या चिमुकलीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितेल्या २२ प्रतिज्ञासह इतर थोर महापुरुषांचे जीवन चरित्र आपल्या ओघवत्या वाणीतून उपस्थितांसमोर प्रत्यक्ष साकारले त्यानंतर उपस्थित उपासिका संघांना पांढऱ्या साड्या वाटप सम्राट डोंगरदिवे यांच्या मातोश्री यांच्या हस्ते करण्यात आल्या तिसऱ्या सत्रात गीत गायन या गीतगायन कार्यक्रमात शाहीर संभाजी भगत बुद्ध भीम गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमांमध्ये आमदार , जि. प. सभापती ,सदस्य, पंचायत समिती सभापती ,सदस्य ,अधिकारी / कर्मचारी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील बौद्ध उपासक उपासिका हजारोच्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पोही येथील महिला संघ , पंचशील नवयुवक मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांसाठी भोजनाची व्यवस्था करत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भवनसुंदर वानखडे व पोही येथील राहुल वानखडे यांनी तर आभारप्रदर्शन बाळासाहेब ढोके यांनी केले.