देश

Turkey Earthquake: ३० हजारांहून अधिक लोकांना जीवदान देऊन NDRF टीम भारतात परतली, जल्लोषात स्वागत

हिंडन विमानतळावरून हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर एनडीआरएफचे जवान गोविंदपुरम येथील बटालियनकडे रवाना झाले.

तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपानंतर एनडीआरएफच्या 8 व्या बटालियनच्या जवानांनी आपल्या धाडसी कृतीने लोकांना दुसरे जीवन दिले.

तुर्कस्तानमधील ढिगार्‍यातून 30,000 हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर NDRFचे जवान शुक्रवारी मायदेशी परतले.

हिंडन एअरफोर्सच्या हवाई पट्टीवर एनडीआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एनडीआरएफ जवानांचे जोरदार स्वागत केले. NDRF जवानांचे पहिले c-17 ग्लोबमास्टर विमान हिंडन विमानतळावर सकाळी 9.00 वाजता पोहोचले.

येथे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनीही ऑपरेशन दोस्त यशस्वी केल्याबद्दल एनडीआरएफचे अभिनंदन केले. येथून हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर एनडीआरएफचे जवान गोविंदपुरम येथील बटालियनकडे रवाना झाले.