Couch-the-Run
ताज्या बातम्या

Couch the Run अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे वॉल पेंटिंग काढण्यात आले

मूर्तिजापूर : नेहरु युवा केंद्र अकोला (युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार) च्या माध्यमातून मूर्तिजापुर तालुक्यातील सिरसो या गावांमध्ये कौच द रन अंतर्गत गावाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी केंद्र शाळा सिरसो व जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ शाळा सिरसो या दोन्हीही शाळेच्या भिंतीवर पावसाच्या पाण्याची साठवण करण्याकरिता नागरिकांमध्ये चित्रांच्या माध्यमातून व सुविचारांच्या माध्यमातून जनजागृती करण्याकरिता चित्र काढण्यात आले.

यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सिरसो गावाचे सदस्य प्रविण रवींद्र वरोकार व जयकुमार महादेवराव तायडे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी वर्ग व स्वामी विवेकानंद युवा मंडळ सिरसोचे अध्यक्ष, सचिव व सदस्य उपस्थित होते. तसेच पेंटर सुरेश धाटे, पेंटर पाठक, पेंटर मंगेश वाडेकर यांचे योगदान लाभले.नेहरू युवा केंद्र अकोल्याच्या मूर्तीजापुर तालुक्यातील तालुका कोऑर्डिनेटर कु. रिंकू अनिल भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉल पेंटिंगच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.