वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई!
वाशिम७एप्रिल:-वाशिम जिल्ह्यातील भुकरमापक महीलेला 7एप्रिल रोजी 30 हजार रुपयांची लाच घेताना वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार वाशिम जिल्हा भूमी अभिलेख कार्यलयात कार्यरत असलेली भुकरमापक महिला कु. मायादेवी रघुनाथ तलवारे वय 42वर्षे, रा.वाशिम हिने वाशिम जिल्ह्यातील तोरणाळा येथील रहिवासी असलेले 45वर्षीय तक्रारदार यांचे मौजे कार्ली ता.जि. वाशिम गट क्रं44 मध्ये तक्रार दार त्याच्या भावाच्या नावे असलेल्या गट क्रं91 व 92याची चुकीच्या पद्धतीने मोजणी झाल्याने तक्रार दार आणि त्याच्या भावाच्या शेतीचा काही भाग गट क्रं91 व 92 मध्ये गेला होता, नमूद चुकीच्या मोजणी दुरुस्ती करून देण्यासाठी महिला भुकरमापक महिला कु. मायादेवी तलवारे हिने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. तडजोडी अंती30 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.नमुना फिर्यादीला लाचेची रक्कम देण्याची नसल्याने, या प्रकाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम जिल्हा वाशिम यांच्याकडे केली. त्यावरून 7 एप्रिल2022 रोजी नमूद तक्रारची पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान लाचेची30 हजार रुपयांची रक्कम वाशिम येथील बस स्थानक समोरील सदा आनंद रसवंती समोर देण्याचे निश्चित झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सरकारी पंचासमक्ष 30 हजार रुपये स्वीकारताना कु. मायादेवी तलवारे यांना अटक केली. लाचखोर महिले विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे. ही कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत ,देविदास घेवारे, यांच्या नेतृत्वाखाली वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ममता अफूने, पोलीस कॉ. टवलाकर,असिफ शेख,रवी घरत,योगेश खोटे यांनी केली.