पुणे

21वर्षीय तरुणाचा अल्पवयीन मित्रावर बलात्कार!


उमेश मेश्राम,पुणे प्रतिनिधी:-२१नोव्हेंबर,पुण्यातील तुळजाई पठार भागात राहणाऱ्या  एका १६वर्षीय मुलावर, त्याच्याच एका२१वर्षीय मित्रांनेच ओळखीचा फायदा घेत बलात्कार केल्याची घटना दांडेकर पूल परिसरात१९नोव्हेंबर २०२१रोजी घडली.सागर सोनवने वय २१वर्षे, असे या विकृत तरुणाचं नाव आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की,तळजाई पठार येथे राहणारा एक अल्पवयीन मुलगा दांडेकर पूल येथे त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. तेव्हा या मुलाचा जुना मित्र सागर सोनवणे (वय २१ वर्ष) हा तिथं भेटला. ओळखीचा फायदा घेऊन सोनवणे याने अल्पवयीन मुलाला जवळच्या स्वच्छतागृहात नेलं आणि मारहाण करून अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केले.घरी परतल्यानंतर या घटनेची माहिती पीडित अल्पवयीन मुलाने आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर आरोपीला तपास पथकाने शोधून अटक देखील केली.दरम्यान, ज्या अल्पवयीन मुलाबाबत ही घटना घडली त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपीवर कलम ३६३, ३७६, ३७७, ३२३, ५०६ अन्वये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियन २०१२ कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली आहे.