सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील घटना!
सातारा३०डिसेंबर:-सातारा जिल्ह्यातील पाटण ढेबेवाडी येथील एका भागात एका नराधमाने ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून, तीची निर्घृणपणे हत्त्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली.संतोष चंदू थोरात असे अटक करण्यात आलेल्या नराधामाचे नांव आहे.पिडीत चिमुरडीचा मृतदेह२९डिसेंबर२०२१रोजी गावाला लागूनच असलेल्या डोंगरातील दरीत मिळून आला आहे. चिमुरडीवर अत्याचार करून, त्यानंतर तीची निर्गुण हत्त्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.हत्त्या झालेली मुलगी ही इयत्ता दुसरीत शिकत होती.ती दुपारच्या वेळी खेळायला बाहेर गेली होती, मात्र उशिरा पर्यंत घरी न परतल्याने .हा प्रकार तिच्या आजीच्या ही बाब लक्षात आल्याने,तिचा शोधाशोध सुरू केला. परंतु ती मिळून न आल्याने, तशी माहिती पोलिसांना देण्यात आली. ही गंभीर घटना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात घडल्याने पाटण पोलिसांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवत आरोपीला अटक करण्यात आली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत रात्रभर कसून तपास केला. संतोष चंदू थोरातवर संशय आल्याने त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता पहाटे त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.घटनास्थळाला आणि पीडित मुलीच्या कुटुंबियांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांसह भेट घेऊन माहिती घेतली. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल, असा तपास पोलिसांकडून केला जाईल, अशी देसाई यांनी दिली आहे.