राजकीय

५५वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत”अशी”घटना कधीच पहिली नाही-शरद पवारांचा गंभीर आरोप!

संसदेत घडलेली बुधवारची घटना लोकशाही विरोधी!

  1. शरद पवार यांच्या गंभीर आरोप

नवी दिल्ली १२ऑगस्ट:-न्यूज डेस्क:-संसदेच्या पावसाळी अधिवेधनाच्या शेवटच्या दिवशी(बुधवारी) लोकशाहीच्या सभागृहात महिलांना अपमानित करण्याचा जो प्रकार घडला,तो प्रकार अत्यंत निंदनीय असून लोकशाही विरोधी असल्याचा गंभीर आरोप ट्विटवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. राज्यसभेत झालेली महिला खासदारांना मारहाणीला सत्ताधारी पक्ष जबाबदारी असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. केंद्रातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या लोकशाही विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.माझ्या५५ वर्षाच्या राजकिय जीवनात महिलांना अशी वागणुक दिल्याचं मी पहिल्यांदाच अनुभवलं,ही बाब अतिशय दुःखद आणि लोकशाही विरोधी आहे.बुधवारी घडलेला प्रकारचा सर्वच पक्षाच्या खासदारांनी केल्याचं, ट्विटरद्वारे पवारांनी जाहीर केलं. संसदेच्या सभागृहात घडलेल्या, त्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खाली काढलेल्या विजय चौकापर्यंतच्या मोर्चा त १५पक्षांंचे खासदार सहभागी झाले होते. या मोर्चात बोलतांना आम्हाला सत्ताधारी पक्ष शेतकरी कायदे,पेगॅसेस मुद्द्यांवर सभागृहात बोलू दिले नाही,असा आरोपही यावेळी करण्यात आला. सुरक्षा रक्षकांच्या वेशात असलेल्या जवानांनी महिला खासदारांना मारहाण केली, असा आरोप शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी केला.