devendra-fadanavis
राजकीय

४ कोटीचा प्रकल्प पोहचला २६३ कोटींवर, ४४ वर्ष गावकरी तहानलेले ….

फडणवीस म्हणाले, धरणाचे काम तातडीने पूर्ण करू

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम गेल्या ४४ वर्षापासून सुरू आहे. ३ कोटी ९५ लाख रुपये किमतीच्या या प्रकल्पाची किंमत २६३ कोटीवर पोहोचली आहे. मात्र अजूनही तिथल्या रहिवाशांना पिण्यासाठी घोटभर पाणी मिळालेले नाही. ग्रामीण भागातील दारुण अवस्था सदस्य आमश्या पाडवी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे आज विधानपरिषद मांडली. धरणाच्या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेद्र फडणवीस यांनी यावेळी विधान परिषदेत दिले.

दहेली धरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याबाबत सदस्य आमशा पाडवी यांनी विधान परिषदेत तरांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिले. फडणवीस यांनी सांगितले की, १९७४ साली दहेली धरणमंजूर करण्यात आले. प्रत्यक्ष कामास १९८९ मध्ये सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाची मूळ किंमत तीन कोटी ९५ लाख किंमतीची असून रुपये २४६.४९ कोटी इतक्या रकमेची तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या प्रकल्पावर जानेवारी, २०२२ अखेर रुपये २६३.९० कोटी एवढा खर्च झालेला आहे. देहली प्रकल्पाची घळभरणी मे, २०२२ अखेर पूर्ण करण्यात आलेली असून प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण झालेला आहे असे फडणवीस यांनी सांगितले.

या धरणाची घळभरणी मे २०२२ अखेर पूर्ण करण्यात आल्याने प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा निर्माण झालेला आहे प्रकल्पावर सिंचन क्षमता तीन हजार १६५ हेक्टर प्रस्थापित असून त्याकरिता बंदिस्त नल्लीकांद्वारे वितरण प्रणाली योगिता आहे या प्रकल्पाचे काम विविध पातळीवर करण्यात येईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.