ताज्या बातम्या

१७हजारांची अवैध देशी दारू जप्त.

  • १७हजाराची अवैध देशी दारू जप्त!
    अकोला प्रतिनिधी:-७जुलै रोजी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, ढोर बाजार परिसरातून १७ हजार रुपयांची देशी दारुसह एका आरोपीला अटक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सिंधीकॅम्प मधील ढोर बाजार परिसरात राहणाऱ्या विशाल लक्ष्मण ढोकणे हा आपल्या राहत्या घरातून देशी दारूची अवैध विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती खदान पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाली, त्या माहितीच्या आधारे ७जुलैच्या ०४.३०वाजता दरम्यान विशाल ढोकणे याच्या घराची झडती घेतली असता,त्याच्या घरातून १७ हजार ६४०रुपये किमतीच्या पाच पेट्या जप्त करण्यात आल्या,यावरून२१वर्षीय विशाल लक्ष्मण ढोकणेरा.सिंधी कॅम्प अकोला,याला अटक करून, त्याच्या विरुद्ध दारूबंदी अधिनियम६५ई कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपिला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक डी. सी.खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील,डीबी पथकाचे पो. हे.कॉ.राजेश वानखडे, कपिल राठोड,धीरज वानखडे,  यांनी  केली.