महाराष्ट्र

१२ऑगस्ट पासून मॉल्स आणि हॉटेल्स 10 वाजेपर्यंत सुरू राहणार!

 

राज्य सरकारचा हॉटेल्स आणि मॉल्स मालकांना दिलासा!

मुंबई, 11 ऑगस्ट : राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अपेक्षित घट आल्याने,तसेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाला यश आल्याने,हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येतांना दिसत आहे. राज्य सरकारने लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासोबतच,१२ऑगस्ट पासून राज्यातील हॉटेल्स आणि माल ५०टक्के आसन क्षमतेने, रात्री १०वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल्स आणि मॉल्स मालकांना दिलासा मिळाला आहे. परंतु हॉटेलमध्ये आणि मॉल्स मध्ये जाण्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत, त्यामध्ये कोरोना लसीचे दोनही ढोस घेतलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे.तसेच हॉटेल्स आणि मॉलमध्ये काम करणाऱ्या दोन्हीही डोस घेतलेल्या कामगारांना कामावर जाता येईल.ही माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ राजेश टोपे यांनी दिली आहे. असे असताना राज्यातील मंदिर आणि थिएटर आणि इतरही मनोरंजन कार्यक्रमावरची बंदी मात्र कायम आहे ,त्या बाबत अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही.हे निर्णय टास्क फोर्स सोबत चर्चा करुनच घेतले आहेत