अकोला

१० हजार रु. वाढ करुन २७ हजार रुपये पगार देण्यात यावा ; श्रमिक कामगार संघटनेची मागणा

अकोला :अमरावती येथे सुरक्षा रक्षकांच्या असलेल्या मागण्या व वेतनवाढ व भत्यात वाढ करण्याची मागणीकरिता जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची बैठक कामगार कार्यालयात उपायुक्त अमरावती येथे दि. १३ मार्च २०२३ रोजी इतर श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने संपन्न झाली.

या बैठकीमध्ये सुरक्षा रक्षक कामगाराच्या प्रश्नावर यथोचित सांगोपांग विचार विनिमय करण्यात आला.सुरक्षा रक्षकांना केन्द्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे व सुरक्षा रक्षकांना कामगारांना २७ हजार रुपये वेतन देण्यात यावे. सुरक्षा रक्षकांना शासनाच्या नियमाप्रमाणे ७ तारखेच्या आंत सुरक्षा रक्षकांचा पगार करण्यात यावा, सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांचा विमा देण्यात यावा. सुरक्षा रक्षक मंडळाचे पगार सुरक्षा रक्षकांना कामगार नियम व निर्मुलन अधिनियम १९७० च्या तरतुदीनुसार पगार देण्यात यावा.

सुरक्षा कामगारांचा पी.एफ. प्रॉव्हिडेट फंड ऑफिसला जमा करण्यात यावा व पी. एफ. नंबर व यु एन नंबर देण्यात यावा. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष सर्वश्री बदरुजमा, जिल्हा संघटक अशोक अबगड, अभिनंदन इंगळे, प्रशांत वाहुरवाघ, विनोद देशमुख, अलिम शहा, भुषण खवले, श्रावण खंडारे, ललिता राठोड, मंदाताई इंगळे, श्रावण खंडारे, शाम तेलगोटे, प्रकाश गिरी, उमेश टरले, विनोद वाघ, मंगेश काटोले हे संघटनेचे सदस्यगण या बैठकीला उपस्थित होते. असे अशोकराव अबगड जिल्हा संघटक यांनी कळविले आहे.