क्राईम

१०० कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल अनिल देशमुखांना CBI कडून दिलासा?

मुबंई२९ऑगस्ट:-आयपीएस अधिकारी यांनी केलेल्या लेटर बॉम्ब मुळे, चौकशीच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे माजी राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांना १००कोटी रुपये वसुली प्रकरणात  सीबीआयने दिलासा दिल्याची माहिती समोर येत आहे., मुंबईतील बियरबार वाल्यांकडून १०० कोटी रुपये वसुलीचे आदेश देशमुख यांच्यावर  करण्यात आले होते.परंतु प्राथमिक चौकशी दरम्यान देशमुख यांच्या विरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने, अनिल देशमुख यांचा १००कोटी रुपये वसुली प्रकरणात सहभाग नसल्याचा६५पानांचा अहवाल सीबीआयने सादर केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.परंतु सोशल मीडियावर होणाऱ्या या अहवालाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.उपअधीक्षक आर. एस.गुंजाळ यांनी हा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या अहवालात अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे नसल्याने,ही चौकशी बंद करण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.आज पर्यंत अनिल देशमुख यांची सीबीआयने केलेल्या चौकशी दरम्यान देशमुख यांच्या विरोधात एकही सबळ पुरावा मिळून न आल्याने ,तसेच सीबीआयच्या ताब्यात असलेले सचिन वाझे आणि अनिल देशमुख बैठक झाल्याचे किंवा बोलणी झाल्याचे तपासादरम्यान आढळुन आले नसल्याने, ही चौकशी थांबविण्यात यावी, असे अहवालात नमूद केले आहे.त्यामुळे अनिल देशमुख यांनी कोणत्याही प्रकारचा दखल पात्र गुन्हा केल्याचं स्पष्ट होत नाही. असेही या अहवालात म्हटले आहे, या अहवालामुळे राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले असून, अनिल देशमुख यांच्यावर इतके आरोप केलेले  असूनही, सीबीआय अनील देशमुख यांना अटक करण्यासाठी ठोस पुरावे नसल्याचे कारण सांगत आहे.