ऑन लाईन११सप्टेंबर:-एका प्रसिद्ध लेखकाने म्हटले आहे की, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, परंतु चक्क२५ पुरुषांसोबत एखाद्या महिलेने प्रेम करून पळून गेली असेल,तर याला काय म्हणावं, असाच प्रकार आसामच्या धिंग गावात घडला आहे.मिळालेल्या माहितीनुसार एक महिला एक किंवा दोन नाही तर चक्क 25 जणांसोबत पळून गेली आहे. आसाममधील (Assam) ही 40 वर्षीय महिला गेल्या 10 वर्षांत 25 वेळा तिच्या प्रेमींसह पळाली आहे.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा, जेव्हा ही महिला आपल्या सासरी परतते तेव्हा तिचा नवरा आणि तिचे कुटुंबीय तिला नेहमी माफ करतात. महिलेच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत आणि तिला 3 मुले आहेत, त्यापैकी मोठी मुलगी 6 वर्षांची आहे, मुलगा 3 वर्षांचा आहे आणि सर्वात धाकटा मुलगा 3 महिन्यांचा आहे. महिलेचा पती मफिजुद्दीन व्यवसायाने गाडी चालक आहे. हे कुटुंब भारतातील आसामच्या धिंग लाहकर गावात राहते.याबाबत मफिझुद्दीन म्हणाला- ‘माझे लग्न 2011 मध्ये झाले होते, तेव्हापासून माझी पत्नी तिच्या वेगवेगळ्या प्रेमींबरोबर सुमारे 25 वेळा पळून गेली आहे. प्रत्येक वेळी ती परत येते आणि वचन देते की ती पुन्हा असे करणार नाही, पण प्रत्येक वेळी ती आपले वचन विसरून पळून जाते.’त्याने पुढे सांगितले की, ‘आम्हाला तीन मुले आहेत. मुलांचे संगोपन आणि काळजी घेण्यासाठी मी पुन्हा माझ्या पत्नीचा स्वीकार करेन.’ अशा नुकत्याच घडलेल्या घटनेबाबत त्याने सांगितले, ‘4 सप्टेंबर रोजी, जेव्हा मी कामावरून घरी परतलो, तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितले की माझी पत्नी माझ्या 3 महिन्यांच्या मुलाला शेजाऱ्याकडे सोडून पळून गेली आहे. तिने शेजाऱ्याला सांगितले की ती शेळीसाठी चारा आणायला जात आहे मात्र ती परत आली नाही. घरातून पळून जाताना तिने तिच्यासोबत 22 हजार रुपयेही नेले आहेत.’यावेळी ती कोणासोबत पळून गेली हे पतीलाही माहित नाही. माध्यमांशी बोलताना मफिझुद्दीन म्हणाला की, तो त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करतो, म्हणून त्याने तिला पुन्हा स्वीकार करण्याची तयारी दर्शविली आहे.