क्राईम

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा६००क्विंटल गहू जप्त!

अकोला पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई!
अकोला प्रतिनिधी१८सप्टेंबर:-गोरगरिबांना शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली मार्फत देण्यात येणारा६००क्विंटल गहू खामगाव येथून  काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना,१७ सप्टेंबर रोजी बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त करण्यात आला. ही कारवाई अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने केली.एवढया मोठ्या प्रमाणात सरकारी रेशनचा गहू पकडल्याने रेशन माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना खबऱ्या मार्फत गोपनीय माहिती मिळाली की, खामगाव येथून शासकीय रेशनचा गहू  काळ्याबाजारात विक्रीसाठी जात आहे. नमूद माहिती वरून पोलीस निरीक्षक पाटील आणि त्यांच्या चमूतील कर्मचारी यांनी,बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या,राष्ट्रीय महामार्गावरील साई ढाबा येथे नाकाबंदी करून,खामगावच्या दिशेने येणाऱ्या AP-20,TB-4699 क्रमांक असलेल्या ट्रकला थांबवून,झडती घेतली असता, नमूद ट्रक मध्ये सरकारी रेशनच्या गव्हाचे असलेले६००पोते त्याचे वजन३०टन आहे.नमूद गहू कोणाचा आहे,कुठे नेण्यात येत आहे,याबाबत ट्रक चालकाला विचारपूस केली असता,सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर, हा गहू शासकीय रेशनचा असून,तो गहू तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे विक्रीसाठी जात असल्याने सांगितले. यावरून ट्रक चालक शे.जावेद शे.ख्वाजा वय२८वर्षे, रा.भंगारी पुरा,आदीलाबाद तेलंगणा राज्य, याला अटक करून,त्याच्याकडून ६लाख रुपयांचा३०टन गहू,२०लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण२६लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ट्रक चालकाविरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात, भारतीय जीवनावःश्यक अधिनियम सन1955 कलम 3,7  कलमानवाये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून, हा काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या रेशनचा मालक कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली.पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.