earthquake-himachal
ताज्या बातम्या देश

हिमाचल प्रदेशातील चंबा आणि कांगडा येथे भूकंपाचे धक्के

शिमला, 21 फेब्रुवारी : हिमाचल प्रदेशातील चंबा आणि कांगडा जिल्ह्यात सोमवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.7 मोजली गेली.

शिमला हवामान केंद्रानुसार रात्री १०.३८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा केंद्रबिंदू चंबा जिल्ह्यात जमिनीपासून पाच किलोमीटर खाली होता. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक सुदेश मोक्ता यांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के कमी तीव्रतेचे होते. यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

विशेष म्हणजे हिमाचल प्रदेश भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. चंबा, कांगडा आणि मंडी जिल्ह्यांचा समावेश अत्यंत संवेदनशील झोन 4 आणि 5 मध्ये करण्यात आला आहे.

1905 मध्ये चंबा आणि कांगडा जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपात 10,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.