पश्चिम महाराष्ट्र

हरिदास सावंत यांना २०२१ चा शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान

 

 

 

 

 

 

सातारा५सप्टेंबर : साखरवाडी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षक हरिदास दिगंबर सावंत यांना शिक्षकररत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.गेली तीन दशके सावंत सर हे अध्यापन करीत आहेत. शालेय स्पर्धा परीक्षा,तसेच शालेय,आंतरशालेय जिल्हा व राज्य स्तरावरील निबंध,वकॄत्व, नाट्य,नॄत्य स्पर्धांसाठी मार्गदर्शन शिष्यवृत्ती व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत विद्यालयाचा उच्चांकी निकाल.महाराष्टॄ शासनाच्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धांसाठी आतापर्यंत ४२ बालनाट्याचे दिग्दर्शन ,६ वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळवून दिली आहेत.सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजीत तालुका व जिल्हा स्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये ३ वेळा उत्कृष्ट अभिनय व दिग्दर्शकाची १०० पेक्षा जास्त पारितोषिके मिळाली.दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शालेय विद्यार्थ्यांना समुह नॄत्याचे दिग्दर्शन आतापर्यंत दोन नॄत्ये प्रसारित.वॄक्षारोपण व रक्तदान या राष्ट्रीय कार्यात सहभाग, साखरवाडी परिसरात आजपर्यंत १५ वेळा रक्तदान शिबीराचे आयोजन, सुमारे १२०० बाटल्यांच रक्त संकलन व स्वतःही प्रत्येकवेळा रक्तदान.अशा या हरहुन्नरी शिक्षकाला मनुष्य बळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षणरत्न २०२१ पुरस्कार मिळाला आहे. सातारा जिल्ह्यातून हरिदास दिगंबर सावंत यांची ही एकमेव निवड आहे.हरिदास सावंत हे जयंती महोत्सव समितीचे सहकोषाध्यक्ष बी.एल.माने यांचे मेव्हणे आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सावंत यांचे , बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ, सचिव प्रा.माणिक आढाव,बी.एल.माने,माया माने,वंचितचे सचिव दादासाहेब केंगार,जितेंद्र मोरे व स्मिता मोरे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.