ताज्या बातम्या

हरवलेले जनप्रतिनिधी शोधून आणणार्‍यास ५१ रुपयांच्या बक्षिसाची घोषणा

गांधीग्राम अकोट मार्ग सहा महिने बंद असल्याचे निषेधार्थ वंचित युवा ‘गुरु गोविंद दोनो खडे, किसके लागू पाय, आघाडीने हरवलेले जनप्रतिनिधी शोधान्यासाठी घातले महादेवाला साकडे

अकोट : गांधीग्राम अकोट मार्ग सहा महिने बंद असल्याचे निषेधार्थ वंचित युवा आघाडीने हरवलेले जनप्रतिनिधी शोधान्यासाठी घातले महादेवाला साकडे. शोधून आणणार्‍यास ५१ रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करीत आज वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने गांधीग्राम येथे अभिनव आंदोलन करण्यात आले.

अकोला अकोट मार्ग हा गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे अकोला अकोट रस्त्यावरील वाहतूकी साठी बंद असून त्यामुळे सामान्य नागरिक विध्यार्थी आणि शेतकरी त्रस्त आहेत, मात्र सहा महिने उलटून देखील त्यावर काहीही उपाययोजना झाली नाही.उलट तात्पुरती पूल करून वाहतूक सुरू करण्याचा दिखाऊपणा आणि त्याचेही श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करण्यात येत असल्याने संतप्त युवा आघाडी ने आज आंदोलन केले.

सदर आंदोलनामध्ये अकोला जिल्ह्याचे निष्क्रिय खासदार संजय धोत्रे, अकोट विधानसभा मतदारसंघाचे निष्क्रिय आमदार प्रकाश भारसाकळे आणि अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निष्क्रिय आमदार रणधीर सावरकर हे हरविले आहेत ह्यांना शोधून देणार्‍या ५१ रुपयाचे रोख बक्षीस जाहीर करीत तिन्ही जनप्रतिनिधी चे फोटो सोबत माहिती सार्वजनिक करण्यांत आली.

शोधून आणणार्‍यास अकोला जिल्हाधिकारी कार्यालया समोर बक्षीस देण्याचे आशयाचे बॅनर आंदोलनामध्ये झळकले सदर आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

ह्या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे आणि जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर ह्यांनी केले, याप्रसंगी वाहतुकीसाठी बंद असलेल्या मार्गाचे काम पूर्ण होऊन सदर मार्ग लवकरात लवकर सामान्य जनतेसाठी खुला होऊ दे ह्यासाठी अकोला वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा कार्यकारणीच्या वतीने पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून साकडे घालण्यात आले.

याप्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा संघटक समीर पठाण, जिल्हा कोष्याध्यक्ष दादाराव पवार, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अ‍ॅड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गवई, नितीन वानखडे,जिल्हा सचिव आनंद खंडारे, आशिष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजित तेलगोटे, अकोला पूर्व महानगर अध्यक्ष जय तायडे, नागेश उमाळे, दादू लांडगे,मंगेश सवंग,विजय भटकर,दीपक ठाकूर,विकास सावळे, वैभव खडसे,अकोट तालुका महासचिव निशांत राठोड, अकोट तालुका संघटक नंदकिशोर मापारी, तेल्हारा तालुका संघटक अनंता इंगळे, रामदास वानखडे, अनिल वानखडे, निखिल तायडे, दीपक दरोकर, निशांत दारोकर, अमर वानखडे, आकाश गवई, आकाश जंजाळ, रंजीत तायडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.