Swamini-sangathana
अकोला

स्वामिनी संघटनेचे महिला सेवेतील सातत्य वाखाणण्यासारखे – पूजा काळे

अकोला: स्वामिनी संघटनेचे महिला सेवेतील सातत्य वाखाणण्यासारखे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा पूजा काळे यांनी केले.स्वामिनी विधवा विकास मंडळ अकोलाच्या वतीने आयोजित विरस्त्री स्व. लताताई देशमुख यांच्या ४६ व्या जयंती कार्यक्रमाच्या मूख्य अतिथी प्रसंगी पूजा काळे बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळ सेविका शालिनीताई देशमुख ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती स्वामिनी संघटनेच्या सचिव प्राध्यापक सुनीता डाबेराव ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून इंजिनीयर तथा बांधकाम व्यवसायी प्रशांत कोठारी हे होते.वीरस्री लताताई देशमुख यांच्या जीवनावर सुनिता टाले यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वामिनी संघटनेच्या कार्याचा आढावा सांगितला.

जिल्हाध्यक्षा साधना पाटील यांनी वर्षभरात महिलांना केलेली मदत अधिक वाढविण्यासाठी भविष्यातील योजना सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना राजपूत यांनी केले तर आभार प्रतिभा काकडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष देशमुख, मंदार जाधव, योगिता शहा, प्राची कुलकर्णी, अनुश्री चव्हाण, दिव्या खंडेलवाल, साक्षी गव्हाणकर, चेतना गोयल, भावना अग्रवाल, विद्या विरोकार, कविता तायडे , विद्या नवघरे, मीरा वानखडे, रंजनाताई वारकरी, अंजली सरोदे, मीरा लोखोडे, ज्योती शर्मा, पुष्पा सपकाळ, देवयानी देशपांडे, दिपाली पाटील योगीता मुंडे, महेंद्र आलीझार , संजय जैन , संजीवनी कृपलाणी, शाहीन परवीन, जुबेदा पठाण, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अंजली डाबेराव-पिंपळे हिने राष्ट्रगीताने केली.