स्वप्नील सरकटेअकोट:/१५ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रंभापूर येथे वूक्षमित्र परीवाराची स्थापना करून वृक्षलागवड मोहिमेस प्रारंभ करण्यात आला यावेळी अध्यक्ष म्हणून सप्तखंजेरीवादक संदीपपाल महाराज गिते यांनी आपल्या खास शैलीत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले वृक्षारोपण करिता मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड सामाजिक वनीकरणाचे हाते साहेब वनविभागाचे तायडे साहेब जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर शिवसेनेचे नगरसेवक मनिष कराळे राजीव खारोडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गावकऱ्यांशी मुक्त संवाद साधला व गावपयोगी प्रत्येक कार्यक्रमात पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले ए.पी.ओ तायडे सरांनी देखील रोजगार हमी योजनेची जोड देऊन वृक्षसंगोपन करिता पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले,शेवटी बांबु रोप उपलब्ध झाल्यावर गावातील नदीकाठावर लोकसहभागातून बांबु लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले व वृक्षसंगोपणाचे महत्व विशद केले,राजे संभाजी अकॅडमीच्या वतीने गावातील ४ गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते वृक्षमीत्र परिवाराचे अनावरण करून वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी योगेश मोरे,डी.यस.जायले प्रकाश राऊत,काळे सर , कुलट सर ,गाडगे सर, कैलास टोलमारे, प्रकाश कुकडे , जिवन गावंडे पाणी फाउंडेशन आकोट,वैभव गुजरकर ,आकाश लोणारे,रोशन कंकाळे,संतोष नवलकार,अविनाश गिते, सागर गिते प्रकाश गिते.तसेच गावातील सर्व गावकरी मंडळी व बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण बोंद्रे सर यांनी केले आभार प्रदर्शन व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सावरा रंभापूर गटग्रामपचांयत चे उपसरपंच धिरज गजानन गिते मित्रपरिवाराने केले होते.