अकोला प्रतिनिधी:-१२ऑगस्ट:अकोला रेल्वे स्टेशन चौकात१ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून, स्टेशन चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची स्थापना करून,त्या चौकाचे शाहीर अण्णाभाऊ साठे असे नामकरण करण्यात आले. अकोला रेल्वे स्टेशन चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची स्थापना झाल्यामुळे, त्या ठिकाणचे पावित्र्य राखणे गरजेचे झाले आहे. या चौकात असलेल्या खंडेलवाल हिंदूधर्म शाळे समोर रात्री८वाजल्यानंतर याठिकाणी मद्यपी आणि सामाजिक अप्रिय घटना घडतील अशा व्यक्ती एकत्र येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे याठिकाणी एकत्र येणाऱ्या मद्यपींंचा बंदोबस्त करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याध्यक्ष अशोक नागदेवे आणि शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे अकोला जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.पुढे त्यांनी दिलेल्या निवेदनात शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला लागून,गर्द ,व्हाईटनरची नशा करणारे भिकारी बसतात,यामुळे पुतळ्याच्या पावित्र्य धोक्यात आणून, सामाजिक भावना दुखावल्या जाण्याचा प्रकार होण्याचे शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी बसून अप्रिय कृती करणाऱ्यावर नजर ठेवून, गैर कृत्य केल्यास योग्य कारवाईची मागणी निवेदनात केली आहे. हिंदू धर्मशाळा आणि प्रभात भोजनालायची प्रवेशद्वारे कायम बंद करून, त्यांच्या प्रवेशद्वारांची दिशा बदलून,पुतळ्याचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी५०×५०चौरस फुटाचा राखीव करावा,याठिकाणी पोलीस चौकीची निर्मिती करण्यात यावी. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करावे, अण्णाभाऊ साठे यांना मानणारा वर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याने, भविष्यात याठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी अशा मागण्या या निवेदनातुन करण्यात आल्या आहेत. आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास रिपब्लिकन(आठवले) पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनात तुन देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाध्यक्ष अशोक नागदेवे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे संघटक आकाश हिवराळे,युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ राहुल इंगळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विवेक किर्तक,उपाध्यक्ष भूषण प्रधान,आदिवासी आघाडी प्रमुख बन्सीलाल शिंदे,नितीन जाधव जे.पी.सावंग,प्रेम समुद्रे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनाची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ दखल घेऊन,अकोला रेल्वे स्टेशन चौकातील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जवळ बसणाऱ्या मद्यपी विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश, रामदास पेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना दिले