अकोला: स्थानीय कामा प्लॉट येथील रहिवासी व अनेक वर्षापासून सामाजिक,सांस्कृतिक व सर्व धर्माच्या महिलांच्या सेवा कार्यात सदा सक्रिय असणार्या सौ मंगला पुरुषोत्तम श्रावगी यांना यंदाचा राष्ट्रीय नारीरत्न पुरस्कार मिळाला आहे.परभणी येथे एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र द्वारा आयोजित सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार सौ श्रावगी यांना बहाल करण्यात आला.
तसेच स्वालंबी विद्यालयात सेवारत असणार्या प्रा सीमा आनंद शुक्ला यांनाही हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.राज्यभरातील महिलांमधून निवड झालेल्या ११ महिलांमधून सौ मंगला श्रावगी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मराठी चित्रपट अभिनेत्री वैशाली दाभाडे, विश्व हिंदू महासंघाचे राष्ट्रीय सहसंयोजक पुरुषोत्तम श्रावगी, ज्येष्ठ समाजसेवी अनिल नरेडी वर्धा, एकता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अजमत खान, ज्येष्ठ साहित्यिक संगीताताई जामने, परभणीचे प्रथम माजी महापौर प्रताप भैय्या देशमुख, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार दडके, जेष्ठ साहित्यिक डॉ संगीता अवचार, समाजसेवी पवन निकम, संस्थेचे परभणी जिल्हाध्यक्ष अरुण पडघन आदींच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह प्रदान करून सौ मंगला श्रावणी यांचा गौरव करण्यात आला.श्रावगी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे उषा अग्रवाल,उषा चितलांगे,शकुंतला राठी,नीता पंड्या, रीता खडसे, रमा पसारी, शीला खेतान,नीता एस अग्रवाल, रवी खंडेलवाल, प्रशांत भरतीया, विजय बियानी,पुरुषोत्तम पसारी,निरंजन अग्रवाल,ज्येष्ठ पत्रकार शौकतअली मिरसाहेब,डॉ जुगल चिराणिया, राकेश केजरीवाल,अशोक अग्रवाल, ज्येष्ठ रंगकर्मी रमेश थोरात,शंकर अग्निहोत्री आदींनी अभिनंदन केले.