Solar-Project
अकोला

सौरऊर्जा प्रकल्प ६० दिवसात होणार सुरू:अकोल्यात मेडाने दिली भेल कंपनीला दिली मुदतवाढ

अकोला :अमृत योजनेअंतर्गत महान न केल्याने ५ मालमत्ता सिल जलशुद्धीकरण केंद्र आणि शिलोडा मलजल शुद्धीकरण केंद्र परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प आता ६० दिवसात कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मेडाने हे काम करणार्‍या भेल कंपनीला ६० दिवसाची मुदतवाढ दिली आहे.शिलोड मलजलशुद्धीकरण केंद्र आणि महान येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात एकुण १४०० किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे.

प्रकल्पाचे काम १५ महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. केवळ नेट मिटरींगमुळे प्रकल्पाचे कार्यान्वयन रखडले आहे. रोहित्रातील वाढीव दुरुस्ती (उपकरण बदलणे) खर्चात वाढ झाल्याने या खर्चाच्या सहमतीचे पत्र मेडाने महापालिकेस मागीतले. महापालिकेने मेडा ला सहमती पत्र पाठवले. पत्र पाठवुन चार महिने झाल्या नंतर आता मेडाने शिलोडा येथील प्रकल्प २८ फेब्रुवारी पर्यंत कार्यान्वित करण्याचे पत्र प्रकल्पाचे काम करणार्‍या भेल कंपनीला दिले होते.

मात्र २८ फेब्रुवारी पर्यंत नेटमिटरींगचे काम पूर्ण होवू शकले नाही.रोहित्रातील दुरुस्तीसाठी लागणारा व न दिलेला ७० लाख रुपयाचा निधी देण्याचे पत्र दिले. त्यामुळे नेटमिटरींगचे काम होऊ शकले नाही. या सर्व अनुषंगाने दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत, महापालिकेने महाऊर्जाला पत्र दिले आहे.

या पत्रात कामास विलंब होत असून प्रकल्प १५ महिन्यापासून तयार असताना कार्यान्वित न झाल्याने महापालिकेचे २.२५ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.याबाबत प्रकल्पाचे काम करणार्‍या कंत्राटदारावर दंड आकारणे आवश्यक होते, या आशयाचे पत्र मेडाला दिले. तसेच ७० लाख रुपयाचा भरणाही केला. या नंतर मेडाने भेल कंपनीला प्रकल्प सुरू करण्यासाठी केवळ ६० दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता या ६० दिवसात भेल कंपनीला हे दोन्ही प्रकल्प सुरू करावे लागतील.