अजय प्रभे,
मूर्तिजापूर १६ ऑगस्ट – ग्रामपंचायत सोनोरी मूर्ती चे सरपंच हे त्यांच्या गरोदर पत्नीसह ग्रा.मा.४९ च्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमरण उपोषणाला १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता बसले होते परंतु आमरण उपोषणाला बसले असल्याची माहिती अकोला जिल्हयाचे पालकमंत्री बच्चू कडू यांना कळताच त्यांनी प्रहार पक्षाचे कडू यांचे निकटवर्तीय प्रहार कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी मूर्तिजापूर विधानसभा प्रमुख यांच्या माध्यमातून सरपंच सुमित राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली चर्चेमध्ये बल्लू जवंजाळ यांनी जिल्हा नियोजन मधून तुमच्या रस्त्याचे काम आपण प्रस्तावित करणार असल्याचे आश्वासीत केले व आपण उपोषण थांबवावे असे सांगितले तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मुर्तिजापूरच्या उपअभियंता निशिगंधा जवंजाळ यांनी येणाऱ्या २०२१ – २०२२ च्या कार्यक्रमामध्ये आपले रोडचे काम पूर्ण करणार असल्याचे लिखित पत्र दिले सदरहू उपोषणाला पंचायत समिती मूर्तिजापूरचे सहाय्यक गटविकास अधिकारी अभिजित बन्नोरे ,विस्तार अधिकारी पजई ,कीर्तने जिल्हा परिषद बांधकामचे सोनोने ,सामाजिक कार्यकर्ते सतीश अग्रवाल ,शेरवाडी चे सरपंच स्वप्नील ढाकरे ,सरपंच संघटना तालुका अध्यक्ष महादेवराव खांडेकर,तालुका सचिव विनोद मानकर, उपाध्यक्ष अमोल गढवे, ग्रामपंचायत सचिव एस व्ही शर्मा व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थित मध्ये उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली आपण उपोषण मागे घेत असल्याची माहिती सरपंच सुमित राऊत यांनी दिली