sonia-gandhi-in-chhattisgarh
देश राजकीय

सोनियांनी राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या ८५व्या अधिवेशनात पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.

सोनिया शनिवारी आपल्या भाषणात म्हणाल्या – भारत जोडो यात्रेमुळे माझी राजकीय वाटचाल आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे.पक्षाध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून आलेल्या चढ-उतारांबाबत सोनियांनी पहिल्यांदाच चर्चा केली.

त्या म्हणाल्या- १९९८ मध्ये मी पहिल्यांदा पक्षाध्यक्ष झाले तेव्हपासून आजपर्यंत म्हणजे गेल्या २५ वर्षांत अनेक चांगले आणि काही वाईट अनुभव आले.२००४ आणि २००९ मधील पक्षाची कामगिरी असो किंवा मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्याचा माझा निर्णय असो. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हे समाधानकारक होते.

यासाठी मला कार्यकर्त्यांचे पूर्ण सहकार्य लाभले. मला सर्वात जास्त समाधान देणारी गोष्ट म्हणजे माझा भारत जोडो यात्रेने माझी राजकीय वाटचाल समाप्त होऊ शकते.

पक्षासाठी हा टर्निंग पॉइंट आहे.पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण आहे. सरकार रेल्वे, जेल, तेल सर्वकाही आपल्या मित्रांना विकत आहे. दिल्ली सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा Dर्‍A गरीब विरोधी आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या की, राहुल गांधींनी खडतर प्रवास पूर्ण केला आहे. देश आणि काँग्रेससाठी हा आव्हानाचा काळ आहे. राहुल शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी संबोधित करणार आहेत.