अर्थ

 सुरक्षाच्या दृष्टीने दुरुस्तीसाठी, मारुती सुझुकी कंपनीने पावणे दोन लाख वाहने परत बोलावली!


नवी दिल्ली५सप्टेंबर:-वाहन निर्मिती साठी अग्रण्य असणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीने सुरक्षाच्या दृष्टीने काही वाहनात त्रुटी आढळून आल्याने,देशातील विविध कंपनीच्या शोरूम मधून विक्री करण्यात आलेले पावणे दोन लाखाच्या जवळपास वाहने,दुरुस्ती साठी परत बोलाविण्यात आले आहेत.या वाहनात निर्मितीच्या वेळी काही त्रुटी शिल्लक असल्याने, कंपनीने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात वाहन निर्मिती मध्ये अग्रेसर असनाऱ्या मारुती कंपनीने पेट्रोल वर चालणाऱ्या१ लाख ८६हजार वाहनामध्ये सेप्टिचा अभाव असल्याचे आढळून आल्याने, संबंधित वाहने दुरुस्ती साठी बोलाविण्यात आली आहे.४मे२०१८ ते२७ऑक्टोबर२०२० या कालावधीत तयार करण्यात आलेल्या, वाहनांमध्ये सुरक्षाच्या दृष्टीने काही उणिवा आढळून आल्याने, त्याची दुरुस्ती साठी ही वाहने कंपनीच्या अधिकृत शोरूम च्या वर्कशॉप बोलाविण्यात आली असून, दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग मोफत बदलूनदिले जातील, यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगितले आहे. नमूद कालावधी मध्ये एर्टीगा, सियाझ,व्हिटारा, ब्रेझा, एसक्रॉस,एक्सएल-6 ही वाहने खरेदी केलेल्या ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत शोरूम मधून फोन द्वारे माहिती देऊन वाहने दुरुस्ती करून दिल्या जातील,हे दुरुस्तीचे कामे येत्या नोव्हेंबर पासून केले जातील.दरम्यानच्या काळात वाहनधारकांनी पाण्याच्या भागात प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक भागावर पाणी पडणार याची काळजी घेण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.सेमिकंडक्टर चीपचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे वाहन उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. सप्टेंबरमध्ये सर्वच कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.कंपनीच्या किरकोळ चुकीमुळे कंपनीला कामाचा ताण वाढणार आहे.आपले वाहन या यादीत आहे का हे पाहण्यासाठी कंपनीने वेबसाईटवर सुविधा सुरू केली आहे. यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर संबंधित मॉडेलच्या लिंकवर जाऊन चेसीस नंबर टाकल्यास माहिती उपलब्ध मिळणार आहे.चेसीस नंबर वाहन आयडी प्लेटवर एम्बॉस्ड असतो. तसेच वाहनाचे बिल आणि नोंदणीच्या कागदपत्रांमध्ये देखील नमूद केलेला असतो.अशा प्रकारे संबंधित दुरुस्ती करण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर माहिती मिळणार आहे.