ठळक मुद्दे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पंतप्रधान मोदींना ,मराठीतुन पत्र
- सीमाभागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला थांबवा! फोडली
- मराठी भाषिकांच्या मागणी सोडविण्यासाठी पंतप्रधान यांच्याकडे केली विनंती
पुणे११ऑगस्ट: कर्नाटक मधील सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्या अन्याय होत असल्याने सीमावर्ती भागातील मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे. कर्नाटक कात सामील असलेल्या सीमावर्ती भागातील मराठी भाषिक गावांप्रती कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक आणि माणुसकी विरोधी आहे. सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्या,’ अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.अजित पवार यांनी मराठी भाषेत हे पत्र लिहिलं आहे. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन होऊन ६० हून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावं अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत. संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासीयाचं स्वप्न आहे. हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढ निर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे,’ असं मत अजित पवार यांनी पत्राव्दारे पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्त केले आहे.अजित पवार यांच्या पत्राच्या प्रधानमंत्री काय दखल घेतात,याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे