अकोला

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बार्टी),पुणेच्या वतीने काळाराम मंदिर प्रवेक्ष सत्याग्रह वर्धापनदिन साजरा

अकोट :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ( बार्टी ),पुणेच्या वतिने काळाराम मंदिर प्रवेक्ष सत्याग्रह वर्धापनदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश अण्णाजी गाढवे(बार्टी), पुणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. उत्तम शेंडे ( बा.दे. पारवेकर कनिष्ठ महाविद्यालय, पारवा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ त्यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्याचा हक्क मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले.

आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रकाश अण्णाजी गाढवे(बार्टी) पुणे त्यांनी जातीव्यवस्थेचे समुळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही असे मत व्यक्त केले.तसेच समाजकल्याण व बार्टीच्या योजनांची माहिती दिली.

आरटीई, स्कॉलरशिफ, स्वाधार योजना, इ माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.विजय धों.जितकर (विधी सेवा समिती सदस्य)शिवाजी ज्यु.कॉलेज, आकोट,जि.अकोला त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि सर्व जातीच्या नांगरिकांना प्रवेक्ष मिळाला. असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कर्‍हाळे (प्रकल्प अधिकारी) बार्टी, पुणे यांनी केले. मान्यवरांचे आभार कु. मनिषा खंडाळकर (बार्टी), पुणे यांनी मानले. कार्यक्रमाला, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.