अकोला

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बार्टी),पुणेच्या वतीने महाराजा सयाजीराव गायकवाड जयंती तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मृदिनानिमित्य मार्गदर्शन

अकोट: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग(बार्टी),पुणेच्या वतिने महाराजा सयाजीराव गायकवाड जयंती तसेच छ्त्रपती संभाजी महाराज स्मृतीदिनानिमित्प विशेष कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश अण्णाजी गाढवे(बार्टी), पुणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.उत्तम शेंडे(बा.दे.पारवेकर कनिष्ठ महाविद्यालय पारवा, ता. घाटंजी, जि.यवतमाळ) त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड जयंतीनिमित्य त्यांच्या विशेष कार्याची माहिती दिली.

एैतिहासिक कामगीरीची माहिती दिली.सामाजिक समता जोपासणारे राजे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रकाश अण्णाजी गाढवे(बार्टी), पुणे त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्य शुभेच्छा देऊन त्यांच्या एैतिहासिक कार्याची माहिती दिली. त्यांनी समाजव्यवस्था बदलवण्यासाठी सतत प्रयत्न केले असे मत मांडले तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्य अभिवादन केले.

तसेच त्यांच्या एैतिहासिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. विजय धों. जितकर ( विधी सेवा समिती सदस्य,जेष्ठ समाजसेवक )शिवाजी ज्यु.कॉलेज,आकोट ,जि.अकोला त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी समाजाला नवी दिशा देऊन प्रगतीचा मार्ग दाखवला. जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला तसेच शैक्षणिक व्यवस्था बळकट केली असे मत व्यक्त केले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या राजकिय कार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कर्‍हाळे (प्रकल्प अधिकारी) बार्टी, पुणे यांनी केले. मान्यवरांचे आभार कु. अश्विनी ढोकने (बार्टी), पुणे यांनी मानले. कार्यक्रमाला, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.