अकोला

साडीचोळीचा आहेर देऊन ‘शकुंतले’चा वाढदिवस मूर्तिजापुरात साजरा

अजय प्रभे मूर्तिजापूर,ता.१ : पश्चिम विदर्भाचे भूषण व आदिवासी तसेच शेतकऱ्यांची लाईफलाईन आसणारी मात्र गेली ३ वर्षे बंद असणारी अचलपूर-यवतमाळ ‘शकुंतला’ रेल्वे काल ११० वर्षांची झाली असून शकुंतला बचाव सत्याग्रहींनी ‘शकुंतले’चा १०९ वा वाढदिवस आज पुष्पहार अर्पण करून व साडी-चोळीचा आहेर देऊन साजरा केला.

प्रकाश बोनगिरे, प्रा.सुधाकर गौरखेडे, प्रा.अविनाश बेलाडकर, अजय प्रभे, मिलींद जामनिक, राजेंद्र कपिले आदी सत्याग्रही दुपारी १२ वाजता ‘शकुंतला’ लोकोशेड मध्ये पोचले. तेथील ‘शकुंतले’च्या बंद अवस्थेतील इंजिनला पुष्पहार अर्पण केला व साडीचा आहेर आर्पण केला. प्लॕटफॉर्मवरील नामफलकालाही पुष्पहार अर्पण केला. ज्युनियर टेक्निशियन धिरज साळुंखे, रेल्वे पोलीस दलाचे एएसआय आर.एच. मेतकर, हेड पोलीस काॅन्स्टेबल निलेश पिंपळदे,पीसी दिपक वाटाने, पीसी जयकुमार तायडे, पीसी प्रमोद ढोले यावेळी उपस्थित होते.
१ जानेवारी २१ ला शकुंतला रेल्वेचा १०७ वा वाढदिवस, यवतमाळ ते अचलपूर रेल्वे मार्गावरील सर्व शकुंतला रेल्वे स्थानक सजवून, साजरा करण्याच्या ज्येष्ठ सत्याग्रही विजय विल्हेकर यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबाविण्यात आला.
—————————————————-
शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहीचा निर्धार !
शकुंतला रेल्वे चा सर्व्हे १९०९ साली पूर्ण झाला होता. अवघ्या ४ वर्षात रूळ, पूल वगैरे पूर्ण काम करून२९ डिसेंबर १९१३ ला मुंबई रेल्वे बोर्डाने अंतिम परीक्षण केले. १ जानेवारी १९१३ ला पहिली मालगाडी ‘शकुंतला’ लोहमार्गावर धावली. १ जानेवारी १९१४ ला पॅसेंजर गाडी धावली. हे औचित्य साधून दि २९ डिसेंबर २१ ला यवतमाळ रेल्वे स्थानकावर व दि ३० डिसेंबर २१ ला जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ ला सत्याग्रह करण्यात आला.या वेळी १ जानेवारी २१ ला सर्व शकुंतला रेल्वे स्थानक फुला, पानाने, रांगोळ्यांनी सजवून शकुंतला रेल्वे चा १०९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. २६ जानेवारी २०२२ गणतंत्र दिनी सर्व ‘शकुंतला’ रेल्वे स्थानकावर राष्ट्रध्वज उभारून शकुंतला रेल्वेच्या स्वतंत्र्या साठी भजन करण्यात येणार आहे.
—————————————————-
शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्या वतीने, गेल्या दोन ऑक्टोंबर गांधी जयंती पासून, मूर्तिजापूर ते अचलपूर रेल्वे मार्गावरील, सर्व रेल्वे स्थानकांची स्वच्छता करून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह करण्यात आला. सर्वच गावांमध्ये तरुणांनी प्रचंड उत्साही सहभाग दिला. शकुंतला रेल्वे मेळघाटातील व यवतमाळातील आदिवासी भावांना मध्यरेल्वेच्या मुख्य प्रवाहात आणणारी रेल्वे आहे. शकुंतला रेल्वे मार्गावरील अनेक नगरपालिका, ग्रामपंचायती, सामाजिक शिक्षण संस्थांनी शकुंतला रेल्वे, आहे त्या स्थितीत युद्धपातळीवर सुरू करण्यात यावी, यासाठी ठराव करण्यात आले आहेत. शकुंतला रेल्वे सुरू व्हावी,ती हेरिटेज रेल्वे, पर्यटक रेल्वे म्हणून जतन करण्यासाठी शकुंतला रेल्वे मध्ये कार्य करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी, विनामूल्य सेवा देण्याची मान्य करून, शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाचे बळ वाढवले. तसेच मदन इंडस्ट्रीजचे संस्थापक स्व. मदन माहुले मूळ यवतमाळ चे परतवाड्याला स्थलांतरित होऊन. मदन माहुलेंनी नॅरोगेज रेल्वे निर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. त्यांचे सुपुत्र रेल्वे इंजिनियर श्री ग्यानेश माहुले यांचा शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहात सक्रिय सहभाग आहे. त्यांनी निर्मिती केलेल्या रेल्वे मलेशिया, सौदी अरेबिया, शेगाव, पुणे, मुंबई मध्ये पण हे धावत आहे. आम्हाला परवानगी द्या? आम्ही आमची रेल्वे चालून दाखवतो. या शकुंतला रेल्वे मध्ये किरकोळ खाद्य वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या, तीन दृष्टिहीन बांधवांच्या वतीने उच्च्य न्यायालयात, याचिका सुद्धा दाखल करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे व रेल्वे प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यांची सुद्धा सकारात्मक भूमिका आहे.
– विजय विल्हेकर. ज्येष्ठ सत्याग्रही.
—————————————————-