अकोट: दहीहांडा पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या देवरी फाटा जवळील वेताळ बाब संस्थान ते ग्राम मरोडा गावात जाणारे रोड लगत खार नाल्या जवळ मातीचे गाळात मरोड़ा शेत शिवारात मानवीसांगाडा मिळून आला. सदर साठ वर्षीय इसमाच्या सांगाड्या कुणाचा आहे.
याचा शोध घेणे सुरू आहे तरी नागरिकांना आव्हान करण्यात येते की या संदर्भात काही माहिती असल्यास दहीहंडा पोलिसांशी संपर्क साधावा. जमिनीमध्ये गाडलेल्या अवस्थेत मिळून आलेला हा मानव सदृष्य हडडींचा सांगडा तो मानवी की अमानवी या बाबत निश्चीत तपासणी कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यलय अकोला येथे पाठविण्यात आला असता त्या बाबत १० मार्च रोजी नमुद हाडाच्या सांगडयाची तपासणी होवुन तपासणी अहवाल प्राप्त झाला असून सदर सांगाडा हा मानवी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे पुरुष जातींचा वय अं.६० वर्ष चे वर असलेला आहे.
व हडडयाचा सांगाडा ज्या इसमाचा आहे. तो अंदाजे मागील १ वर्षा पूर्वी मरण पावलेला असावा व मरणाचे कारण स्पष्ट करता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे. सांगता येत नाही. असे अभिप्राय मिळाला हाडा सांगडा ज्या इसमाचा आहे. त्याचे मरणाचे कारणा संबंधी शोध घेणे व त्याची ओळख पटविणे त्या बाबत दहीहंडा पोलिसांनी मर्ग नं. ०४/२३ कलम १७४ जाफ़ी दाखल असून तपासात घेतला आहे तरी आपले परीसरातील कोणी वरील वर्णना सोबत जुळता मिळत्या वर्णनाचा पुरुष ईसम मागील १ ते २ वर्षा पासुन मिसींग असल्यास किंवा खार नाल्याचे पुराचे पाण्यात वाहुन गेला असल्यास मिळुन नं आलेला असल्यास त्या बाबतची माहीती पोस्टे दहीहांडा येथे संपर्क नं. ठाणेदार सुरेंद्र राऊत. मो.नं.८८८८१७३७५६ एएसआय गणेश अवचार मो. नं. ९८८१२६९६७७, वर कळवावे.