मनोरंजन

सलमान खानची भाची अलिझे अग्निहोत्रीचं लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण!

 मुबंई, १६सप्टेंबर: बॉलिवूड मध्ये करियर करायचं असेल तर,नवख्या कलाकाराला प्रचंड प्रमाणात संघर्ष करावा लागतो. परंतु अभिनयाच्या विश्वात कुटुंबातील व्यक्ती सक्रिय असतील, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला फारसा संघर्ष करण्याची गरज पडत नाही.

अशातच सलमान खानची भाची लवकरात अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याची माहिती मिळाली आहे.अलिझे ही सलमान खानची बहीण अलविरा अग्निहोत्री आणि प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.काहीच दिवसांपूर्वी एका जाहिरात फीचर फिल्मच्या शूटिंगमध्ये ती दिसली होती. या जाहिरातीतील तिचा लुक खूपच व्हायरल झाला होता.

अलिझे सध्या काही जाहीराती आणि मॉडेलिंग असाइनमेंट्समध्ये दिसत आहे. त्यामुळे तिच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी चर्चा रंगल्या आहेत.या जाहिरातीत ती अनेक दागिने परिधान केलेले दिसत आहे. या लुकमध्ये अतिशय आकर्षक दिसत आहे. 

कॅप्शनमध्ये अलिझेने तिच्या भावना शेअर केल्याआहेत. ती म्हणते, ‘दागिन्यांमधील मुलीचे पहिले प्रेम म्हणजे कानातले. पण मी कधीच माझे कान टोचले नाही. मी दागिन्यांच्या प्रेमात कधीच नव्हते पण वर्षानुवर्षे दागिन्यांप्रती माझी रुची बदलली आहे.

आधी काहीही न घालण्यापासून, मी आता अशा टप्प्यावर पोहोचलो आहे जिथे मी कपड्यांपूर्वी दागिने ठरवते.’अलिझेचे बॉलिवूड मध्ये येण्यापूर्वीच खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. याशिवाय सीमा खानच्या मॉडेलिंग असाइनमेंटमध्येही ती दिसली होती.

अलिझेने सरोज खान सारख्या नृत्यदिग्दर्शकांकडून नृत्याचे धडेही घेतले आहेत. सध्या ती बॉलिवूडसाठी स्वत:ला तयार करत असल्याचं तिच्या लूकवरून स्पष्ट होत आहे.