अकोला

सर्व शासकीय कर्मचारी संपावर; सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांना फटका

पातूर (प्रतिनिधी / १६ मार्च ) : येथील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी दि. १४ मार्च पासून राज्यातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपाचा फटका मात्र विविध कार्यालयात शासकीय कामांकरता येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि रुग्णालयातील रुग्णांना पडत असल्याचे दिसत आहे.

यात पातूर तालुक्यातील अधिकारी कार्यालय कर्मचारी, महसूल, तहसील, नगर परिषद, शिक्षक संघटना, कृषी, पंचायत समिती, ग्रामसेवक संघटना जि. प बांधकाम, भूमीअभिलेख, खरेदी विक्री रजिस्टर कार्यालय, आरोग्य विभाग आदी शासकीय विभागातील संपूर्ण कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीकरिता बेमुदत संपावर गेले आहेत. मात्र या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह परीक्षा सुरू असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना व रुग्णांना मोठ्या प्रमाणात पडत असल्याचे दिसत आहे.

सोमवारी १३ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि

उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. नेहमी कर्मचाऱ्यांनी अथवा शासकीय कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी गजबजलेले

शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट दिसतो तर दुसरीकडे, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने परिपत्रक जारी केले आहे.

पुकारलेला हा संप बेकायदेशीर ठरू शकतो. तसेच यामुळे कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ