अकोला

सरपंच दिगंबर पिंप्राळे यांचा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार

अकोट: ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटना वाडेगाव व्दारा आयोजित ऐतिहासिक परिषद २०२३ ता.२० फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आली होती.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बहुजनांचे दिपस्तंभ श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून होते.ऐतिहासिक परिषदेत कार्याची दखल घेत अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आकोलखेडचे वंचित बहुजन आघाडीचे जाहिर केलेले व अकोट तालुक्यातून सर्वाधिक मतांनी निवडून आलेले सरपंच दिगंबर पिंप्राळे यांचा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ऐतिहासिक परिषदेला प्रा.अंजलीताई आंबेडकर,वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर,परिषदेचे अध्यक्ष गोपाल राऊत, बालमुकुंद भिरड,?ड.संतोष रहाटे,वंचित युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा आदी उपस्थित होते.ऐतिहासिक परिषदेला हजारोंच्या संख्येने ओबीसी व अत्यल्प समाज बंधुभगिनींची उपस्थिती होती.