क्राईम

समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या १३कामगारांवर मृत्यूचा घाला!


  1. सिंदखेड राजा२०ऑगस्ट:-मुंबई ते नागपूर हा प्रवास सुकर करण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी शासनाच्या वतीने, समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे.अशातच कंत्राटदार हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी धडपड करीत आहेत.या रोडच्या कामावर असणाऱ्या परप्रांतीय कामगार जात असताना, ज्या वाहनातून हे कामगार प्रवास करीत होते.त्या ट्रकला अपघात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे भीषणअपघात झाला, या अपघातात१३कामगारांचा जणांचा मृत्यू,झाल्याची दुर्दैवी घटना २०ऑगस्टच्या सकाळी घडली, याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, समृद्धी महामार्गावर काम करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीडला  लोखंडी सळी घेऊन जात असतांना,तळेगाव येथे हा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात १३ कामगार मृत्यमुखीपडले,या ट्रक मधून१७ते१८कामगार कामावर जात होते. समृद्धी महामार्गावर काम करणारे मजूर परप्रांतीय असल्याचं समोर येत आहे. ट्रकमध्ये एकूण 17 ते 18 मजूर होते. या मजुरांपैकी 13 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत