मुर्तिजापूर प्रतिनिधी२सप्टेंबर:-मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालय येथे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पै. तानाजी जाधव यांचा मार्गदर्शनुसार मुर्तीजापुर टायगर ग्रुपच्या वतीने समाजसेवक प्रा एल डी सरोदे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . रक्तदान शिबिराचे उद्घघाटन राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश संघटक रविकुमार राठी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले . लक्ष्मीबाई देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून वाढदिवसानिमित्त केक कापून यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घघाटन करण्यात आले .महाराष्ट्रात रक्ताची सतत उणीव भासत आहे .अशावेळी प्रत्येकाने आपला वाढदिवस व सामाजिक उपक्रम राबविताना रक्तदान शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे .कारण रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे असा विचार रविकुमार राठी यांनी मांडला .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश संघटक रवीकुमार राठी विनोद नागे , बाळा शितोळे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष मनोज वानखडे , दिपाली देशमुख, रंजना सदार ,वर्षा कावरे, मीना जवादे ,वनिता पाथरे , बाळासाहेब गणोरकर , अजय प्रभे वंदे मातरम आपत्कालीन पथक व टायगर ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
समाज सेवक प्रा एल.डी.सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर!
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव रवी राठी यांची उपस्थिती