अकोला

सनदी लेखापाल शाखेत बँकिंग विषयावर कार्यशाळा संपन्न

अकोला: द असो.ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अकोला शाखेच्या वतीने आयसीएआय भवन येथे बँकिंग विषयावर कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या विषयावर आयोजित या व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रादेशिक व्यवस्थापक सौ मंजुषा जोशी उपस्थित होत्या.

शाखेचे अध्यक्ष सीए सीमा बाहेती यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या व्याख्यानात सौ जोशी यांनी बँकिंग क्षेत्रात मागील तीन दशकात झालेले विविध बदल याची माहिती देत सनदी लेखापाल यांनी विहित कालावधीत योग्य रीतीने लेखापरीक्षण करून जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ब्रांच न्यूज बुलेटीनचे विमोचन करण्यात आले. या व्याख्यानात यावेळी वक्ते म्हणून उपस्थित अहमदाबाद येथील सीए दिपेन शाह यांनी ऑडिट इन सीबीएस इन्व्हरमेन्ट या विषयावर तर सीए रोहित पोरवाल सुरत यांनी लॉंग फॉर्म ऑर्डर रिपोर्ट या विषयावर तथा सीए आशिष बडगे नागपूर यांनी आयआरएसी नॉर्थ कर्ज व एनपीए या विषयावर व्याख्यान देत श्रोत्यांच्या शंकाचे निराकरण केले.

व्याख्यानाचा प्रारंभ सरस्वती पूजन व दीप प्रजवलनाने करण्यात आल्या. मान्यवरांचे स्वागत शाखेचे अध्यक्ष सीए सीमा बाहेती यांनी केले.सीए अलका अग्रवाल यांनी मुख्य अतिथींचा परिचय दिला. संचालन सीए प्रणय बाफना यांनी तर आभार सचिव सीए सुमित आलिमचंदानी यांनी मानलेत. या व्याख्यान मालेच्या सफलतेसाठी कार्यकारिणी सदस्यांनी अथक परिश्रम केले अशी माहिती जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सीए रमेश चौधरी यांनी दिली.