sanjay-raut-letter
राजकीय

संजय राऊत यांनी जीवे मारण्याची धमकी, श्रीकांत शिंदेनी सुपारी दिल्याचा आरोप, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र 

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे  खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी हि सुपारी दिल्याचा आरोप राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे. या धामी प्रकरणानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था राहिली कि नाही असा सवाल उपस्थित केला आहे.

राज्याच्या सत्तासंघर्षातील घडामोडीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निशाणी ठाकरे गटाकडून हिसकावून घेतल्यानंतर हा दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

खासदार राऊत यांनीही मुख्यमंत्री शिंदेंवर असभ्य भाषेत टीका केली होती. यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील कलह  कलह वेगळ्याच दिशेने जात आहे.  ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रकात  केला आहे.

तसेच संजय राऊत यांनी या प्रकरणी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनाही पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत अनेकांची नावं असल्याची माहिती आहे. या सर्वांकडून आपल्याला धोका असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.  दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी ही केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याचं म्हटलंय. जर चौकशीत तसं काही आढळलं नाही तर त्यांच्यावर मानहाणीचा दावा करण्यात येईल. याची चौकशी झालीच पाहिजे असेही शिरसाठ म्हणाले.

फडणवीसांना दिलेल्या पत्रात हे म्हटलंय

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. हि महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व  सुरक्षा हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही.

असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आह. व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात. तरीही एक गंभीर बाबा मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.