shaktidhaam akola
अकोला

श्री शक्तिधामच्या गर्भगृहाचा शिलान्यास भक्तीभावात संपन्न

अकोला: आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे राजराजेश्वर नगरीत सोमवारी दुपारी आगमन झाले.आर्ट ऑफ लिविंग व शक्तिधाम सेवा समितीच्या निर्माणाधिन शक्तीधाम वास्तुच्या गर्भगृहाचा पावन शिलान्यास व स्थानिय गोरक्षण रोडवरील एकविरा मैदानात आयोजित महासत्संग भक्तीपर्व साठी गुरुदेव महानगरात उपस्थित झाले.

आ.वसंत खंडेलवाल यांच्या पुढाकाराने स्थानीय गीता नगर परिसरात शक्तिधाम सेवा समितीच्या निर्माणाधिन शक्तीधाम वास्तुच्या गर्भगृहाचा पावन शिलान्यास यावेळी गुरुदेवांच्या हस्ते भक्तीभावात पार पडला.गुरुदेवांच्या आगमन प्रसंगी त्यांचे स्वागत आ. वसंत खंडेलवाल व कुटुंबाच्या वतीने करण्यात आले.

तर विश्वस्त सुशील खोवाल व डॉ एस एम अग्रवाल यांच्या वतीने पगडी चढवुन त्यांचे स्वागत करण्यात आले.तर विजय अग्रवाल व ट्रस्टच्या महिलाच्या वतीने गुरुदेवांचे स्वागत करण्यात आले .यावेळी गुरुदेवांच्या हस्ते वास्तू मधील तिन्ही गाभारांचे शिला पूजन करण्यात आले.यावेळी सर्व ट्रस्टी उपस्थित होते.सोहळ्यात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी उपस्थित भक्तांना यावेळी संबधित केले.ते म्हणाले, तपस्या शिवाय जीवनात कोणतेही काम होत नसल्याचे स्पष्ट केले.

दुपारची ही वेळ अष्टमी व नवमीची संयुक्त वेळ असून शिलान्यासच्या पावन कार्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. ते म्हणाले, भगवंत सर्वत्र आहे. त्याला ओळखण्यासाठी शक्तीची गरज आहे. जीवनात पुढे जाण्यासाठी ही शक्तीची नितांत गरज असते. अशी शक्ती शक्तिधामच्या रूपाने नगराला मिळाली आहे. या नगराचे या माध्यमातून कल्याण होणार असल्याचे सूतोवाच यावेळी केले. ते म्हणाले, शक्तिधाम सदैव भक्तासाठी शक्ती देण्याचे केंद्र राहणार असा आशीर्वाद प्रदान केला.

आपल्या प्रास्ताविकात माजी महापौर विजय अग्रवाल यांनी शक्तिधामच्या वास्तूची माहिती दिली. या वास्तूत स्वर्णजडीत मूर्ती साकार करण्यात येणार असून आचार्य निवास सुद्धा निर्माण करणार असल्याचे सांगितले. दरम्यान नागपूरहून आलेल्या संगीत चमुने उपस्थित भक्तांना भक्ती संगीताची मेजवानी दिली.यावेळी आर्ट ऑफ लिविंग व शक्तिधाम सेवा समितीचे पदाधिकारी, विश्वस्त व बाहेरगाववरून आलेले महिला पुरुष भक्त मोठया संख्येने उपस्थित होत