Shri-gadge-maharaj-Vidyalaya
अकोला

श्री गाडगे महाराज विद्यालयाच्या चि . देवांश ची श्रीलंका -कोलंबो येथे होणार्‍या कराटे स्पर्धेसाठी निवड

मुर्तिजापूर : इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेला चि. देवांश संतोष भांडे याने मुंबई येथे झालेल्या वल्ड कराटे २८ ईरो एशिया इंटर नॅशनल कराटे स्पर्धेत ‘ रजत ‘ पदक ‘ मिळविले असून त्याची श्रीलंका – कोलंबो येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

श्री गाडगे महाराज विद्यालय मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार भैय्यासाहेब तिडके , सचिव शिरीषभाऊ तिडके तसेच विद्यालयाचे प्राचार्य गजानन बोचरे यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात .