RamNavami-Samiti
अकोला

श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या अध्यक्षपदी मिश्रा यांची नियुक्ती

अकोला: सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक सेवाकार्यात अनेक वर्षापासून सेवारत व महानगरातील रामनवमी शोभायात्रेचे सुयोग्य संचालन करणार्‍या रामनवमी शोभायात्रा समितीच्या अध्यक्ष पदी जेष्ठ समाजसेची रामप्रकाश मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली.

समितीचे सर्वसेवाधिकारी आ गोवर्धन शर्मा यांच्या उपस्थितीत समितीच्या कार्यालयात रविवारी संपन्न झालेल्या सभेत मिश्रा यांची ही नियुक्ती करण्यात आली.यावेळी समितीच्या पदाधिकार्‍यांनी मिश्रा यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्यात.आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही मिश्रा यांनी देत उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी विहिपचे राहुल राठी, गणेश काळकर, सुरज भगेवार, प्रकाश लोढिया, प्रकाश घोगलिया, डॉ प्रविण चव्हाण हरिओम पांडे, सुनील पसारी,कृष्णा शर्मा, मनिष बाछुका, नविन गुप्ता, सुरेश कुलकर्णी,प्रताप वीरवाणी, , नितीन जोशी, संदीप वाणी, निलेश पाठक, संदीप निकम, ,सुरेश कुलकर्णी, , सुरेंद्र जयस्वाल, सुधाकर बावस्कार,अमर कुकरेजा,आशिष भीमजियानी, कृष्णा सिसोदिया,संजय दुबे,बाळकृष्ण बिडवाई, नितीन जोशी, विलास अनासाने,किशोर मांगटे पाटील,वसंत बाछुका, हेमंत सरदेशपांडे,दिपक बजाज, ज्योती टोपले, रेखाताई नालट,दुर्गा जोशी,कमला भोबळे,आशा ईचे,लक्ष्मी अकोटकर,कमला सोनटक्के, विमल नाचवणे,पुष्पा वानखेडे,साधना येवले,छाया तोडसे,संतोषी शर्मा,सारिका देशमुख,मालती रणपिसे,मनीषा भुसारी,चित्रा बापट,अश्विनी सुजदेकर समवेत बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पुरुष नागरिक उपस्थित होते.